डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची बारावी निकालाची वैभवशाली परंपरा कायम
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची बारावी निकालाची वैभवशाली परंपरा कायम
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीचे भान जपत शैक्षणिक क्षेत्राबरोबर समाजसेवेचे व्रत अंगीकृत करून मानवतेचा वारसा जपणाऱ्या बारावीच्या निकालाची गुणवत्तापूर्ण वैभवशाली परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर करण्यात आला. येथील ग्रामीण व शहरी संस्कृतीचा मिलाफ साधत गौरवशाली परंपरा जपणाऱ्या या महाविद्यालयाने फेब्रु/मार्च २०२५ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल ९९.४० % व कला शाखेचा ७८.०० % तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा ९६.०० % इतका उच्चांकी निकाल प्राप्त करून गरुडभरारी घेतली आहे. गुणवत्तापूर्ण व उच्चांकी निकाल असा वैभवशाली परंपरेचा इतिहास असणाऱ्या या महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक- कु. पाटील पारस संतोष ८६.३३ %, द्वितीय क्रमांक- कु. पवार ऋषीकेश संदीप ८५.०० %, व तृतीय क्रमांक- कु. पेटकर अर्णव राहुल ८४.१७% गुण प्राप्त करत मिळवला आहे तर कला शाखेतून प्रथम क्रमांक- कु.कटगी श्रद्धा गणेश ८२.५ %, द्वितीय क्रमांक- कु. डोईफोडे विराज घनश्याम ७३.०० % व तृतीय क्रमांक- कु. केवट रितू रामकेश ६८.३३ % व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतून प्रथम क्रमांक- कु. मुल्ला मुआज ईस्माईल ७५.००%, द्वितीय क्रमांक- कु. म्हारगुडे सुजाता कोंडीबा ७४.८३ %, व तृतीय क्रमांक- कु. कदम पवन मारुती ७१.८३ % इ. गुण प्राप्त करत हे यश मिळवले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा.डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉ. शिवाजीराव कदम सर, शालेय समिती च्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम, आदरणीय माजी आ. मोहनशेठ कदम, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह मा. प्रि. डॉ. के. डी. जाधव, मा. प्रि. डॉ. एम.एस. सगरे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव, सर्व वर्गशिक्षक आणि विषय शिक्षक-शिक्षिका यांचेही विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment