डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह प्लेसमेंटचे यशस्वी आयोजन
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीमध्ये ‘मॅन काइन्ड फार्मा’ कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राईव्ह प्लेसमेंटचे यशवीरित्या आयोजन करण्यात आले. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये बी.एस्सी. बी. फार्मसी, एम.एस्सी., आणि बी.एस्सी. (कृषी) शाखांच्या ८१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कंपनीने पशुवैद्यकीय अधिकारी या विभागासाठी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली.
कॅम्पस ड्राईव्ह प्लेसमेंट उद्धघाटनप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की, ‘मॅन काइन्ड फार्मा’ सारख्या प्रतिष्ठित कंपनीने आमच्या महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची चांगली सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. जीवनात अशा अनेक संधी येत असतात. या संधीच्या अनुभवातून शिकून अधिक तयारीने पुढील वाटचाल केली पाहिजे. महाविद्यालयाचा प्लेसमेंट विभाग तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असेल तसेच आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या मागणी आणि गरजेनुसार लवकरच संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास,आणि मुलाखत तंत्र यासारख्या विषयांवर अशा कार्यशाळा आयोजित करतील असे आशादायक विधान यावेळी केले.
यानंतर ‘मॅन काइन्ड फार्मा’च्या झोनल मॅनेजर, श्री. विनायक मुडेकर आणि त्यांच्या टीमने आयोजित केलेल्या गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतींच्या प्रक्रियेतून ६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शैक्षणिक योग्यतेसोबतच आत्मविश्वास, संवाद कौशल्ये आणि कामाप्रती निष्ठा यांसारख्या गुणांचे प्रभावी प्रदर्शन दिसून आले.
महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाने या कॅम्पस ड्राईव्हच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. या कॅम्पस ड्राईव्हमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निश्चित झाली आहे.
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्लेसमेंट अधिकारी व समन्वयक डॉ. टी. आर .लोहार यांनी केले. तर आभार प्रा. अमोल वंडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment