डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस.व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव डॉ. विकास आवळे, डॉ.अमर तुपे, प्रा.सौ.भारती भाविकट्टी, डॉ.वर्षा कुंभार, प्रा.आर. एस. काटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही.पोरे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात उच्च ध्येय बाळगले पाहिजे. त्यासाठी कष्टाला पर्याय नाही. डॉ. पतंगराव कदम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बेभान होऊन काम करायला शिका आणि आपले स्वप्न पूर्ण करा. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. केवळ परीक्षा पास होणे हे अंतिम उद्दिष्ट नको तर अवांतर वाचनाची सवय लावली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले त्यांनी या पुढे अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. यापेक्षा उच्च दर्जाचे पारितोषिक कसे मिळेल याचा विचार करा तर ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी नाराज न होता नव्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी व्हा आणि यश मिळवा.
या प्रसंगी वर्षभरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी तसेच संशोधक प्राध्यापक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी केले. सिनियर विभागाचे अहवाल वाचन प्रा. सौ.भारती भाविकट्टी, डॉ. विकास आवळे, डॉ.वर्षा कुंभार यांनी केले. तर कनिष्ठ विभागाचे अहवाल वाचन प्रा. ए. एल जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.भाविकट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.काटकर यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना विभाग प्रमुख डॉ. तुपे यांनी केले होते. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment