yuva MAharashtra डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक वन्यजीव दिन उत्साहात साजरा - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक वन्यजीव दिन उत्साहात साजरा

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक वन्यजीव दिन उत्साहात साजरा


सांगली येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय प्राणीशास्त्र विभागात ३ मार्च २०२५ रोजी जागतिक वन्यजीव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, श्री. बी. एच. मोरे, कार्यक्रम समन्वयक व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. कुंभार तसेच प्रा. नलेश बहिरम उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की, ३ मार्च हा दिवस आपण वन्यजीवांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

वन्यजीव हे पृथ्वीवरील परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. ते नष्ट झाल्यास जैवविविधतेचे संतुलन बिघडते आणि निसर्गचक्र बाधित होते. वाढते प्रदूषण, हवामानातील होणारे बदल, जंगलतोड, आणि मानवी हस्तक्षेप यामुळे वनस्पती आणि प्राणी यांचे जीवन मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहेत. वन्यजीवांचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी माहितीचा प्रसार जनसामान्य लोकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मार्फत व्हावा असे प्रतिपादन डॉ. एस. व्ही. पोरे यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी बीएससी भाग दोन व भाग तीनच्या विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या संरक्षणाविषयी विविध विषयावर पोस्टर सादर केले व त्यांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. कुंभार यांनी केले, आभार प्रा. नलेश बहिरम यांनी मानले.

यावेळी प्राणीशास्त्र विभागातील प्रा. आर. एस. माने, प्रा. पी. डी. जाधव यांच्यासह वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)