Header Ads

Loknyay Marathi

डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयात सुक्ष्मजीवशास्त्र विषयाची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयात सुक्ष्मजीवशास्त्र विषयाची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न            

                         
येथील भारती विद्यापीठाचे डॅा. पतंगराव कदम महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय धोरण अभ्यासक्रम बदल या विषयी पदव्युत्तर सुक्ष्मजीवशास्त्र भाग १ ची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळा ही शिवाजी विद्यापीठातर्फे दि. ११ व १२ सप्टेंबर अशी दोन दिवसांची (अनिवासी), आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेकरिता शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील (स्वायत्त वगळून) पदव्युत्तर सुक्ष्मजीवशास्त्र शिकवत असलेले प्राध्यापक व पदव्युत्तर सुक्ष्मजीवशास्त्र शिकत असलेले विद्यार्थी सहभागी होते. 


सदर कार्यशाळेत १. वैज्ञानिक पद्धती- यामध्ये संशोधन आणि संशोधन पद्धती, गरज, प्रक्रिया आणि तत्वे २. सूक्ष्मजीवांचे पद्धतशीर वर्गीकरणविषयी आधुनिक माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहे, याविषयी चर्चा करणे अत्यंत महत्वाचे होते. तसेच नवीन संगणक आधारीत प्रात्यक्षिके या विषयी तज्ञ मार्गदर्शनाकरिता डॅा. कमलेश जांगीद (शास्त्रज्ञ इ, आगरकर संशोधन संस्था, पुणे ) , डॅा. आशिष पोलकडे (तज्ञ-आंतरराष्ट्रीय कचरा व्यवस्थापन व मार्गदर्शक- भारत इको उपाय आणि तंत्रज्ञान, पुणे), डॅा. प्रफुल्ल शेडे (सहाय्यक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे) यांना बोलावण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॅा. गिरीष पठाडे ( प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, क्रृष्णा विज्ञान संस्था, कराड) यांच्या हस्ते झाले. यावेळेस बोलताना ते म्हणाले, सुक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रमातील नवीन बदल फार महत्त्वाचे आहेत. ते पुढे म्हणाले की, या बदलामुळे संशोधन क्षेत्रात आणखी भर पडणार आहे. या कार्यक्रमाकरिता सुक्ष्मजीव अभ्यासमंडळाचे प्रमुख डॅा. धनराज नाकाडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. धनाजी कणसे होते. त्यांनी सर्व प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, सुक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक्रमातील बदलामुळे विद्यार्थ्यांना त्यातील नवनवीन तंत्र शिकण्यास मिळतील. तसेच यामुळे संशोधनाकरिता मार्ग मिळेल. कार्यक्रम समन्वयक म्हणून सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख सौ. भारती भावीकट्टी, खजिनदार म्हणून डॅा. मारुती धनवडे व सचिव म्हणून डॅा. भरत बल्लाळ यांनी काम पाहिले. कार्यशाळेच्या विविध सत्रातील सुत्रसंचालन डॅा. मारुती धनवडे, अरीफ मुलाणी, कु. सुकन्या कांबळे, सौ. संजीवनी भेडसे, मतीन पटेल यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)