Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे क्रीडा स्पर्धेत यश

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे क्रीडा स्पर्धेत यश


सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील बारावी कला विभागातील विद्यर्थिनी कु. भाग्यश्री बेळगावे हिने तरुण भारत व्यायाम मंडळ, सांगली येथे झालेल्या सांगली मनपा क्षेत्र  बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच व्यवसाय शिक्षण विभागातील बँकिंग अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. सानिका नलवडे  हिने धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून विशेष प्राविण्य मिळविले. सानिकाने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये  यश मिळवून भारती विद्यापीठ आणि डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले . 
        
या दोन्ही विद्यार्थिनींच्या  यशाबद्दल डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. कणसे यांनी  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आदरणीय विजयमाला कदम उर्फ वहिनीसाहेब तसेच सांगली विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम. कदम व कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. अरुण जाधव यांनी या  दोन्ही विद्यार्थिनींना शाबासकी देऊन त्यांचे कौतुक केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)