Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या दिनाचे महत्त्व सांगताना डॉ. कणसे म्हणाले की, संपूर्ण जगभरात सर्वात मोठे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. २६ जानेवारी या दिवशी सर्व भारतीय एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. स्वातंत्र्यानंतर जवळपास तीन वर्षांनी आपला देश सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला, याचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमुळेच आज भारताची एकता टिकून आहे.  या मूल्यांचा आदर करून प्रत्येक नागरिकांनी ती आत्मसात केली पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.
      

यावेळी महाविद्यालयातील  स्काऊट गाईड  विभागातर्फे  मानवंदना, संचलन करण्यात आले. त्याचबरोबर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले‌. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे,  डॉ अमित सुपले, प्रा. तानाजी सावंत, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)