Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
 
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम व प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. एच. एम. कदम म्हणाले की, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद हे आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. समाजोद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत मौलिक आहे. राजमाता जिजाऊ वीर पत्नी तर होत्याच त्याचबरोबर वीर माताही होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर वीराला जन्म दिला म्हणून महाराष्ट्र भूमीत हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
            
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बोलताना डॉ. कणसे म्हणाले की, संपूर्ण जगाला शांती आणि संयमाची शिकवण देऊन भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून देणारे स्वामी विवेकानंद हे आदर्श तत्वज्ञानी होते. शिकागो येथे झालेल्या सर्वधर्मीय परिषदेमध्ये 'माझ्या बंधू आणि भगिनींनो! ' या एकच विधानाने भारतीय संस्कृतीची ओळख त्यांनी निर्माण करून दिली होती. श्रीरामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. ज्ञान, विज्ञान, योग, धर्म, विवेक, अध्यात्म या विषयांवर त्यांनी अनेक भाषणे दिली. त्यांचा जन्मदिवस हा 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून ओळखला जातो.
      
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, प्रा. डॉ. अमित सुपले महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतीक विभागातील डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)