yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा लघुनाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा लघुनाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचा लघुनाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक


(पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड)

सांगली: 

      महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सांगली यांच्या वतीने जिल्हास्तरीय व्यसनमुक्ती जनजागृती लघुनाटिका स्पर्धेचे आयोजन श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, सांगली येथे करण्यात आले होते.

       या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने 'व्यसनमुक्ती आपल्या हाती' या विषयावर सादर केलेल्या लघुनाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे या लघुनाटिकेची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे येथे निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांचे विशेष सहकार्य लाभले. तर डॉ. वर्षा कुंभार आणि डॉ. कृष्णा भवारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. 

       या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. रवींद्र काटकर, प्रा. शंकर पाकले यांनी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)