Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार 'स्वराज्य महोत्सव' या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासली की, संपूर्ण कुटुंब सैरभैर होते. आपण रक्तदान केल्यामुळे नक्कीच कोणाचातरी जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. रक्तदानासंबधी आजही समाजात काही गैरसमज आहेत. परंतु रक्तदान करणे हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल, सांगली यांच्या सहकार्याने घेतलेल्या या शिबिरात अनेक विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबिरासाठी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत तसेच डॉ. अल्तमश भोकरे आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रुपाली कांबळे, डॉ. अंकुश सरगर, डॉ. महेश कोल्हाळ, प्रा. यशवंत धुळगुंड, डॉ. वर्षा कुंभार, डॉ. वंदना सातपुते यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)