Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी. कणसे यांच्या शुभहस्ते झेंडा वंदन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला व मेहंदी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना संदेशपर शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, अशा प्रकारच्या विविध कला प्रकरांमध्ये भाग घेतल्यामुळे विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. कोणत्याही स्पर्धेत हार जीत होत असतेच. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला म्हणून खूप हुरळून जाऊ नये किंवा नंबर मिळाला नाही म्हणून नाराज होऊ नये. आपल्या आयुष्यात अशाप्रकारच्या अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे असते.  

या स्पर्धांसाठी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे -
     

रांगोळी स्पर्धा - गायत्री संदीप भगत (प्रथम), प्रगती प्रमोद सूर्यवंशी (द्वितीय), साक्षी राजेंद्र मगदूम (तृतीय). या स्पर्धेचे परीक्षण- प्रा. सौ.जे .डी .हटकर, डॉ.सौ.एस. वाय. साळुंखे, प्रा. सौ. व्ही.ए.गावडे यांनी केले. 
 

मेहंदी स्पर्धा - नाझिया समीर बागवान (प्रथम), अनुपमा रामसेवक केवट (द्वितीय), रुबीना सर्पेन मुल्ला (तृतीय). 
याचे परीक्षण डॉ.सौ. वर्षा कुंभार, डॉ. वंदना सातपुते यांनी केले. 


वक्तृत्व स्पर्धा - धीरज थोरात (प्रथम), पूर्वा कारेकर (द्वितीय), श्रेया लोखंडे (तृतीय) . या स्पर्धेचे परीक्षण प्रा.सौ. वाघमारे आर. डी. व प्रा. नरेश पवार यांनी केले. या व्यतिरिक्त निबंध व चित्रकला स्पर्धेतही अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
    

या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव यांच्या सह महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उद्धाटन समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु. सुलभा तांबडे यांनी केले तर आभार डॉ. वर्षा कुंभार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कृष्णा भवारी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सतीश कांबळे, प्रा. नरेश पवार व प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)