डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
सांगली -भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने महाविद्यालयामध्ये 'स्वराज्य महोत्सव' या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वप्रथम झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते. यावेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, ज्युनिअर विभागाचे प्रमुख प्रा. अरूण जाधव राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रूपाली कांबळे, प्रा. पाकले, डॉ. ए. एम. सरगर, डॉ. महेश कोल्हाळ, प्रा. यशवंत धुळगंड, डॉ. वंदना सातपुते, डॉ. वर्षा कुंभार यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment