Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम साहेबांना विनम्र अभिवादन

डॉ.पतंगराव कदम साहेबांना विनम्र अभिवादन  
  
सांगली: येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे सर्वेसर्वा, कुलपती, डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. 


याप्रसंगी डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये साहेबांनी शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध केले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. भारती विद्यापीठाची स्थापना करून सर्वसामान्य विद्यार्थ्यालाही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे ही साहेबांची महत्वकांक्षा होती. म्हणूनच हजारो विद्यार्थी भारती विद्यापीठात उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. 'गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन' हे संस्थेचे ब्रीदवाक्य साहेबांनी सत्यात उतरविले आहे. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची पदे भूषविली आणि या पदांवर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केली. म्हणून सर्वच क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही अजरामर आहे.  त्यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीने घ्यायला हवा असा संदेश त्यांनी दिला .
        
या वेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागप्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. नितीन गायकवाड, प्रा. जयश्री हटकर, डॉ. कृष्णा भवारी, प्रा. सतीश कांबळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)