Header Ads

Loknyay Marathi

१ मे महाराष्ट्र दिन

आपणा  सर्वांना १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्या.


कणखर देशा,पवित्र देशा,प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा…… 
दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आपल्या महाराष्ट्र  राज्याची १ मे १९६० रोजी  निर्मित्ती झाली . मागील 60 वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे की आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक आघाडीचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत. 

१ मे रोजी महारष्ट्र कामगार दिन:
खर पहिला गेला तर १ मे  हा दिवस आंतरराष्ट्रीय  कामगार दिन! इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असं लक्ष्यात येत की औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यतः पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध  होऊ लागले. कामगारांकडे काम होतं, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास १४ तास काम कराव लागत असे. याविरोधात कामगार एकजूट झाले आणि त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद  उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्टाच्या चळवळीचा संदर्भ आहे, संयुक्त महारष्ट्रचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला  गेला. या लढ्यात  कामगारांनी घेतलेली भूमिका  अत्यंत महात्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा खऱ्या अर्थाने रस्त्या रस्त्यात लढला गेला, याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट दिन बरोबरच कामगार दिन हि मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.

संयुक्त महाराष्ट्रचा लढा आणि  त्यानंतरचा महाराष्ट्र:
मराठी  भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी ही संकल्पना दस्तुरखुद्द लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉंग्रेसमधूनच विरोध होत गेला. कधी बॉम्बें  हे व्दिभाषिक राज्य व्हावं, तर कधी विदर्भ वेगळा राज्य व्हाव अशा नानाविध सूचना पुढे येऊ लागल्या. दरम्यान चलेजाव आंदोलनान जोर धरला होता तर दुसरीकडे दुसर  महायुद्ध जोरात सुरु होत, ही परिस्थीती लक्षात घेऊन संयुक्त  महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या कार्यकत्यांनी  जरा सबूरीन घेत थोडीशी माघार घेतली होती. १३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करारअंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भा, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त  महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील. काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश ही संकल्पाना अस्तित्वात आली, संस्थाने खालसा करण्यात आली. १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंद चा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० मार्च १९५५ रोजी गिरगाव  इथं काढण्यातआलेला मोर्चा रोखण्याचे आदेश  मोरारजी देसाई यांनी दिले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं  मोरारजी देसाई सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. एवढ्यावर न थांबता मोर्चा वर गोळीबार कारण्यात  आला. यात शेकडो जन जखमी झाले तर १०५ जनांचे प्राण गेले.

या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचं  आंदोलन अधिक तीव्र झाला. ६ फेब्रुवारी  १९५६ रोजी केशवराव  जेधे यांच्या  अध्यक्षतेखाली  पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये आचार्य अत्रे, प्रबोधनकर ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमर शेख अशा एका पेक्षा एक मातब्बर मंडळींचा समावेश होता. यानंतरच्या काळात  आचार्य अत्रे यांनी मराठा मधून नेहरू आणि कॉंग्रेस सरकारच्या धोरणावर शब्दाच्या रुपात घणाघाती हल्ला करायला सुरुवात केली. शाहीर अमर शेखांसह अनेक शाहीरांच्या पोवाड्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे आंदोलन पोहचवलं आणि डाव्या पक्षांच्या, कामगार संघटनांच्या साथीन एक मोठी चळवळ उभी राहिली. पण, सरकार मात्र मानायला तयार नव्हतं. नेहरू सरकारच्या दुटप्पीपणाच्या धोरणाला विरोध करत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेचं उत्स्फूर्त आंदोलन आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन अखेर २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन, मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. अशा रीतीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे झाले.