yuva MAharashtra पीएच. डी. विभागाचे संचालक डॉ. सचिन कदम यांची महाविद्यालयास सदिच्छा भेट - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

पीएच. डी. विभागाचे संचालक डॉ. सचिन कदम यांची महाविद्यालयास सदिच्छा भेट

पीएच. डी. विभागाचे संचालक डॉ. सचिन कदम यांची महाविद्यालयास सदिच्छा भेट


सांगली: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या पीएच. डी. विभागाचे डायरेक्टर तसेच आय.सी.टी विभागाचे संचालक डॉ. सचिन कदम यांनी महाविद्यालयाला आणि ग्रंथालयाला भेट दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी महाविद्यालयाने गेल्या वर्षात केलेल्या वाटचालीची माहिती दिली.   

डॉ. सचिन कदम यांच्या हस्ते Principal’s Diary: March & April 2026 चे प्रकाशनही झाले.  

याप्रसंगी महाविद्यालयातील केमिस्ट्री व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पीएच. डी.च्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष बाब म्हणून त्यांनी Plagiarism Check आणि रिसर्च पेपर्स पब्लिकेशनसाठी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांत Software ची सोय उपलब्ध करून दिली आहे.  

या प्रसंगी ग्रंथपाल प्रा. जयश्री हटकर, प्रा. अमोल वंडे आणि डॉ. नरेश पवार आदी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)