yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात



   

सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली 

येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) व्ही. ए. रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

    महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.

      यानंतर उपप्राचार्य सुपले यांनी आपल्या मनोगतात असे प्रतिपादन केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नसून ते सामाजिक न्याय, समता व बंधुतेचे प्रखर पुरस्कर्ते होते. त्यांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचा अंगीकार करून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

          यावेळी समाजशास्त्र विभागाचे प्रा. सतिश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बाबासाहेबांचे विचार आजच्या काळात अधिकच उपयुक्त ठरतात. त्यांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व व सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा अवलंब करून समाजात समता व न्याय प्रस्थापित करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

     या कार्यक्रमास सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांच्यासह महाविद्यालयातील वरिष्ठ, कनिष्ठ व व्यवसाय शिक्षण विभागातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

     हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)