विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे वळावे - प्रा. मोहन मद्वान्ना
विद्यार्थ्यांनी
मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे वळावे- प्रा. मोहन मद्वान्ना
सांगली :
भारती
विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. पतंगराव कदम यांची जयंती व कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्या
वाढदिवसानिमित्त आयोजित समाज प्रबोधन सप्ताह
तसेच राष्ट्रीय युवा दिना निमित्त
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र
विभागामार्फत 'संशोधन क्षेत्रात युवकांना संधी'
या विषयावर दिनांक १३ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये
मराठी विज्ञान परिषदेचे डॉ.मोहन मद्वान्ना,
सेवानिवृत्त प्राध्यापक (प्राणीशास्त्र), दयानंद
कॉलेज, सोलापूर यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी
मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे वळून देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देण्याचे
आवाहन केले. यावेळी त्यांनी भारतातील अनेक वैज्ञानिकांनी आंतरराष्ट्रीय संशोधनात
क्षेत्रात केलेले कार्य सांगून कसा इतिहास निर्माण केला आहे सांगितले. तसेच
देशाच्या विविध भागात असलेल्या संशोधन संस्था, त्यांच्या स्थापनेचा हेतू तसेच त्याठिकाणी
तरुणांना मिळणाऱ्या संधी विषयी बोलून संशोधन अनुदानासाठी केंद्र सरकारच्या
असणाऱ्या विविध योजनेंची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही. ए. रणखांबे
होते. विद्यार्थी दशेतच
विद्यार्थ्यांनी संशोधनात आवड निर्माण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वागत
आणि प्रास्ताविक करताना प्रोफेसर डॉ. गजानन माळी यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या
कार्याची माहिती देवून वैज्ञानिक माहिती स्थानिक भाषेतून समजावून घेतल्यास जास्त
अवगत होते असे सांगितले. तसेच भारती विद्यापीठाचे संस्थापक व कुलगुरू डॉ. पतंगराव
कदम यांचा आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय शिक्षण धोरणाबाबतचा दृष्टीकोन तसेच
भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांचे विद्यार्थी तसेच शिक्षकांना
संशोधनासाठी प्रेरित करण्याबाबतचे धोरण आणि विविध योजना सांगितल्या. विभागप्रमुख
कु. भारती भाविकट्टी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाविद्यालयीन युवकांकडून
राष्ट्रनिर्मितीसाठी असलेल्या अपेक्षा व्यक्त करून आभार मानले. कु. समृद्धी पाटील
हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment