Header Ads

Loknyay Marathi

महिलांना सन्मानाने जगण्याची संधी क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी मिळवून दिली : डॉ. डी.जी. कणसे

महिलांना सन्मानाने जगण्याची संधी क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांनी मिळवून दिली : डॉ. डी.जी. कणसे


सांगली : ज्यावेळी स्त्रियांना समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला जात नव्हता, अशा वेळी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवीन दिशा दिली व त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून दिली. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.  येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रस्थापित समाजव्यवस्थेचा रोष पत्करून  पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत क्रांती घडवून आणली. एकप्रकारे पुरुषी मानसिकतेवर प्रहार करून तत्कालीन समाजात ज्ञानदानाचे सर्वश्रेष्ठ कार्य त्यांनी केले. सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुले यांना समाजसेवेच्या कमात शेवटपर्यंत साथ दिली. पहिल्या भारतीय शिक्षिका, पहिल्या मराठी कवयित्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक संघर्ष करत सावित्रीबाईंचा शिक्षण प्रवासाचा उपक्रम चालूच राहिला, त्यांना महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या हक्कासाठी स्वतःला काहीतरी करता आहे यावे याचा आनंद वाटत होता.
       
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)