Header Ads

Loknyay Marathi

वाचनानेच आत्मबळ मिळते - श्री. सागर पाटील

वाचनानेच आत्मबळ मिळते - श्री. सागर पाटील
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सांगली ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर पाटील व सांगली ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक सौ. स्मिता पाटील यांचे हस्ते डॉ. रंगनाथन याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. सागर पाटील यांनी वाचनाचे महत्व विषद करून प्रत्येकाचे आपल्या घरात स्वतःचे ग्रंथालय असावे असे प्रतिपादन केले. तसेच वाचनानेच माणूस मोठा होतो, समृद्ध होतो, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वाचन हाच पर्याय आहे. वाचाल तर वाचाल असा त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. तसेच सौ. स्मिता पाटील यांनी आजच्या तरुणाईने सोशल मीडियापासून व सायबर क्राईम पासून कसे सावध रहायचे याविषयी विद्यार्थ्यांच्यात जागृती निर्माण केली. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येय प्राप्तीसाठी वाचन करणे खूप गरजेचे आहे. पुस्तकं हीच आपले सोबती व खरे मार्गदर्शक असल्याने सातत्याने अभ्यास करत राहिल्यास यश हे नक्कीच मिळते. 

कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी केले. सदर कार्यक्रमास कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर सेवक मोठ्या संखेने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya Sangli)