Header Ads

Loknyay Marathi

संविधानातील समानता हे मूल्य प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे : सागर पाटील

संविधानातील समानता हे मूल्य प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे : सागर पाटील
सांगली : दि.12/8/2022 कुटुंबाचे, समाजाचे व पर्यायाने देशाचे प्रतिनिधित्व महिला समर्थपणे करू शकतात फक्त संविधानातील समानता हे मूल्य प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. सागर पाटील यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात 'आझादी का अमृतमहोत्सव' अंतर्गत लेडीज असोसिएशनमार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, भारताला प्राचिन काळापासून कर्तृत्ववान स्त्रियांची गौरवशाली परंपरा आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे.  

यावेळी त्यांच्या सहकारी सौ. स्मिता पाटील यांनी ' सायबर क्राईम' या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्बोधीत केले. मुलींनी समाज माध्यमांचा उपयोग करताना सावध राहिले पाहिजे, अतिउत्साहाने व पसंती मिळविण्यासाठी आपण अनावश्यक वैयक्तिक माहिती देतो ते टाळणे आवश्यक आहे. मुलांनी सर्व गोष्टी आपल्या आईवडिलांशी चर्चा करून अथवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कराव्यात आणि कोणताही निर्णय घाईघाईत न घेता त्याचा सारासार विचार करावा असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, आपले ध्येय निश्चीत करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश मिळते. सध्याच्या काळात मुली प्रगतीपथावर आहेत, मुलांनीही त्यातून बोध घ्यावा. आजपर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान यांसारखी महत्त्वाची पदे आपल्या भारतातील स्त्रियांनी भूषविली आहेत.  

यावेळ 'हर घर तिरंगा' अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस ठाण्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात तिरंगा ध्वज भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेडीज असोसिएशनच्या प्रमुख प्रा.सौ.भारती भावीकट्टी यांनी केले, सूत्रसंचलन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. आभार डॉ. रोहिणी वाघमारे यांनी मानले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)