Header Ads

Loknyay Marathi

स्पर्धापरीक्षा नोकरीचा एक राजमार्ग : भरत साबळे

 स्पर्धापरीक्षा नोकरीचा एक राजमार्ग :  भरत साबळे      

       सांगली : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या आर्थिक बेकारीपेक्षा मानसिक बेकारी जास्त वाढत चालली आहे. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धापरीक्षा हा नोकरीचा एक राजमार्ग आहे असे प्रतिपादन श्री. भरत साबळे यांनी व्यक्त केले. येथील भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा विभाग व संजय घोडावत इन्स्टिट्यूट फाॅर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत  होते. आपल्या व्याख्यानात पुढे ते असे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज असते. चालू घडामोडींबरोबर विषयज्ञानही तितकेच महत्त्वाचे असते.  विद्यार्थ्यांनी स्वतः टिपणे काढायची सवय लावून घेतली पाहिजे. त्यासाठी चौकस आणि चौफेर अभ्यासाची आवश्यकता असते. 

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. डी.जी. कणसे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते  म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी कौशल्ये विकसित करावीत, स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर चिकाटी, जिद्द, एकाग्रता ,मेहनत ,सातत्य, संयम व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.' 

        यावेळी विज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. तानाजी सावंत, डॉ.सूर्यकांत कांबळे, श्री. शहाजी बिरणगे, महाविद्यालयातील  प्राध्यापक,  शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा समिती समन्वयक प्रा.डॉ.वंदना सातपुते यांनी केले. प्रा डॉ.अनिकेत जाधव यांनी आभार मानले. तर प्रा. अमोल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)