Header Ads

Loknyay Marathi

समाजहिताची व सार्वजनिक कल्याणाची कार्ये केल्यामुळे डॉ. पतंगराव कदम लोकनेते ठरले - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

समाजहिताची व सार्वजनिक कल्याणाची कार्ये केल्यामुळे डॉ. पतंगराव कदम लोकनेते ठरले -  प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्यामुळे प्रत्येक माणसाला ते आपले वाटतात. विशेषतः त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. असे मत प्राचार्य डॉ. डी. जी कणसे यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाचे संस्थापक  आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला.

प्रारंभी डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. पी. एम्. पाटील व प्रा. टी. आर. सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

स्वागतपर भाषणात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, मा. डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महाविद्यालयीन तरुणाईने वेगवेगळया क्षेत्रात उतुंग भरारी घ्यावी.

मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की. डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे.

कार्यक्रमास वरिष्ठ, कनिष्ठ व व्यवसायिक शिक्षण विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रंथपाल प्रा. जे. डी. हाटकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन संस्कृतिक विभागातील सहकाऱ्यांनी केले.