Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या लेडीज असोसिएशनची सहल

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या लेडीज असोसिएशनची सहल 


भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या लेडीज असोसिएशनची एक दिवसीय सहल पावस रत्नागिरी व गणपतीपुळे येथील निसर्गरम्य वातावरणात उत्साहात संपन्न झाली. दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी भल्यापहाटे शिवजयंतीनिमित्त शिवज्योती मध्ये सहभाग नोंदवून सहलीचा शुभारंभ झाला. 

पावस येथील स्वामी स्वरुपानंद यांचे मंदिर, गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे दर्शन घेऊन रत्नागिरी येथील भगवती मंदिर व रत्नदुर्गा ला भेट दिली. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या कवी केशवसूत यांच्या स्मारकाला भेट दिली. 

महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अगदी उत्साहाने या सहलीत भाग घेतला. सहलीचे नियोजन लेडीज असोसिएशनच्या प्रमुख प्रा. सौ. भारती भाविकट्टी व प्रा. सौ. ज्योतिका इंगवले यांनी केले. सदर सहलीमध्ये बारा महिला  प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी सहभाग घेतला.