स्वच्छ सर्वेक्षण- २०२१ अंतर्गत डॉ पतंगराव कदम महाविद्यालयास प्रथम क्रमांकाचे मानांकन
स्वच्छ सर्वेक्षण- २०२१ अंतर्गत डॉ पतंगराव कदम महाविद्यालयास प्रथम क्रमांकाचे मानांकन
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ उपक्रमाअंतर्गत सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास महानगरपालिकेने स्वच्छ महाविद्यालय म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महानगरपालिकेच्या उपायुक्त मा. स्मृती पाटील यांच्या हस्ते व स्थायी समितीचे सभापती मा.पांडुरंग कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा सन्मान महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. तानाजी सावंत यांनी स्विकारला.
महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की, भारती विद्यापीठाचे नेहमीच विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. एवढेच नव्हे तर शैक्षणिक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. त्यामुळेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने महाविद्यालयाचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे . याचा मला सार्थ अभिमान वाटतो. इथून पुढच्या काळात सार्वजनिक आरोग्याचा विचार करून सर्वांनी स्वच्छतेचा अंगीकार केला पाहिजे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment