Header Ads

Loknyay Marathi

अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी, इंजिनिअरिंग, फार्मसीच्याही परीक्षा नाहीत, ATKT चा निर्णय बाकी : उदय सामंत

अंतिम वर्षाची परीक्षा न घेता पदवी, इंजिनिअरिंग, फार्मसीच्याही परीक्षा नाहीत, ATKT चा निर्णय बाकी : उदय सामंतअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल.

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant About Last Year Exams) अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली. “अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा घेता येतील”, असं सामंत म्हणाले (Uday Samant About Last Year Exams).

अव्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांना हवी असल्यास ऐच्छिक परीक्षा घेतली जाईल, असं त्यांनी नमूद केलं.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या, इंजिनिरिंग, फार्मसी, आदी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने, राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला आहे.

ATKT चा अजून निर्णय घेतला नाही. मात्र सरकारने त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे, त्यावर कुलगुरु निर्णय घेतील. त्यांची एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घेतलेला निर्णय योग्य होता असं सांगायला ते विसरले नाहीत.