Header Ads

Loknyay Marathi

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
(SSC Tenth Geography Exam Cancelled)

मुंबई : महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक बातमी आहे. एसएससीचा इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर 23 मार्च रोजी होणार होता. परंतु लाॅकडाऊन मुळे दहावीचा हा एक पेपर पुढे ढकलण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा पेपर रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

‘कोरोना’मुळे अनिश्चित कारणासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली.

यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत गुण दिले जातील. त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळेल.

याआधी, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही ढकलगाडी थांबवली होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.