yuva MAharashtra प्रा. भारती भाविकट्टी (मठपती) यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

प्रा. भारती भाविकट्टी (मठपती) यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.

 प्रा. भारती भाविकट्टी (मठपती) यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. 

सांगली : डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख सौ. भारती काडसिद्धेश्वर भाविकट्टी (मठपती) यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून नुकतीच सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. 

त्यांनी 'क्षारयुक्त आणि दुष्काळी भागातील जमिनीतील फॉस्फेट व सिलिकेटचे  विघटन करणाऱ्या जीवाणूंवर अभ्यास करून  विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. पर्यावरणातील प्रतिकूल परिस्थितीचा अशा उपयुक्त जीवाणूंवर होणाऱ्या परिणामाचा सखोल अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून केला असून  यासाठी त्यांना विलिंग्डन महाविद्यालयाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. सुपनेकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम तसेच शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला कदम तथा वाहिनीसाहेब यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले. 

प्रा. भारती भाविकट्टी यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांच्यासह महाविद्यालयातील सहकाऱ्यांनी  त्यांचे अभिनंदन केले. प्रा. भारती भाविकट्टी या कोल्हापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीशैल मठपती यांच्या सुविद्य पत्नी आहेत.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)