डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या रोहिणी वाघमारे यांना पीएच.डी.
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या रोहिणी वाघमारे यांना पीएच.डी.
सांगली: भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रोहिणी धोंडीराम वाघमारे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. ‘A Study of Psychological Disorders in Select American Novels’ या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध पूर्ण केला. त्यांच्या संशोधनास मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय, बोरगाव येथील माजी प्राचार्य डॉ. जयवंत म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
अमेरिकन साहित्यातील निवडक कादंबऱ्यांमधील मानसिक विकार, मानवी मनोसंघर्ष आणि व्यक्तिरेखांच्या मनोवस्थेचे चिकित्सक विश्लेषण या संशोधनातून करण्यात आले आहे.
सहाय्यक प्रा. रोहिणी वाघमारे यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब, भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे यांच्या संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप, सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. एम. एस. सगरे, शालेय शिक्षण संचालक एम. डी. कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. आर. एस. काटकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)

Post a Comment