yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

       यावेळी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले म्हणाले, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या आचरणातून देशाला मूल्याधिष्ठित जीवनाचा आदर्श दिला. गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि सामाजिक समतेचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. तरुणांनी हे विचार केवळ स्मरणात न ठेवता दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे. शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेतून तरुणांनी प्रेरणा घ्यावी. ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेतून त्यांनी देशाच्या सुरक्षेबरोबरच अन्ननिर्मितीचे महत्त्व समजावून सांगितले. 

      जयंतीनिमित्त एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविले. तसेच राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला.

     सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रुपाली कांबळे व एन.सी.सी. विभागप्रमुख डॉ. महेश कोल्हाळ यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. रवींद्र काटकर यांच्यासह महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते




(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)