डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सुधारित अभ्यासक्रमावर कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सुधारित अभ्यासक्रमावर कार्यशाळा संपन्न
सांगली: भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार कला शाखेतील द्वितीय वर्षाच्या शारीरिक शिक्षण आणि भूगोल विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी कणसे लाभले होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, डॉ. एम. ए. कदमपाटील, डॉ. बी.एस.जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. रुपाली कांबळे, डॉ. महेश कोल्हाळ आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. पोरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यापीठातील प्रत्येक विषयाचे अभ्यास मंडळ अत्यंत विचारपूर्वक सुधारित अभ्यासक्रमाची रचना करत असते. त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. मला खात्री आहे की, आजच्या या दोन्ही विषयांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आपणास मौलिक मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थी केंद्रीय शिक्षण प्रक्रिया अधिक समृद्ध करतील.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कणसे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण हे प्रामुख्याने कौशल्यावर आधारित आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी या धोरणाचा निश्चित लाभ होईल. त्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भूगोल व शारीरिक शिक्षण या विषयांतून जीवन कौशल्ये विकसित होतात. पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा जवळचा संबंध आहे. या दोन्ही विषयांचा सखोल ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे आणि या नवीन शैक्षणिक धोरणाचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
बीजभाषक म्हणून उपस्थित असलेले शारीरिक शिक्षण अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. एम. ए. कदमपाटील तसेच भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. बी. एस. जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. महेश कोल्हाळ यांनी केले. तर आभार डॉ. रुपाली कांबळे यांनी मानले. तसेच सूत्रसंचालन प्रा.रोहिणी वाघमारे यांनी केले. या कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शारीरिक शिक्षण व भूगोल विषय शिकवणारे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment