yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नवमतदार जनजागृती अभियान संपन्न - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नवमतदार जनजागृती अभियान संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नवमतदार जनजागृती अभियान संपन्न



सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या व १८ वर्षे खालील वयाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवमतदार नाव नोंदणी विषयी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा. सुषमा लकशेट्टी (निवडणूक नायब तहसीलदार), मा. किसन मगदूम (निवडणूक महसूल सहाय्यक)  आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी  नवमतदार जनजागृती व नोंदणी अभियान याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. यावेळी अतुल जाधव (संगणक संचालक, सांगली) यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की, नवीन मतदार नोंदणीमुळे पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित मतदार संघात मतदान म्हणून नोंदणी करता येते तसेच आपण मतदार जनजागृती विषयी माहिती देतो याचा उद्देश विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, मतदान प्रक्रिया यांची जाणीव जागृती होणे हा आहे. महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर नवमतदार नोंदणी व्हावी, तसेच प्रत्येक पात्र विद्यार्थ्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी, सांगली यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले आहे. सदरच्या उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत  व प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. रुपाली कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.ए.ए.कुंभार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम.पी.गावित यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)