Header Ads

Loknyay Marathi

महात्मा जोतिबा फुले हे सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते : डॉ. डी. जी. कणसे

महात्मा जोतिबा फुले हे सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते : डॉ. डी. जी. कणसे


सांगली :  स्वातंत्र्य, समता, मानवता आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचा पुरस्कार करून समाज हितासाठी नेहमीच अग्रगण्य असणारे महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन  कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 
        
या वेळी बोलताना ते म्हणाले की,  'समाजामध्ये जातीयवाद, धर्मवाद यामध्ये जो संघर्ष सुरू आहे, तो थांबविण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांचे एकोणिसाव्या शतकातील विचार आजही प्रेरणादायी आहेत. अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण, शैतकऱ्यांवरील अन्याय इत्यादी सामाजिक समस्या निवारणासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. म्हणून समाजाने त्यांचा 'महात्मा' म्हणून गौरव केला. त्यांचे सत्यशोधक विचार समाजाने आचरणात आणले पाहिजेत.'
        
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागचे प्रा. डॉ. पोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)