Header Ads

Loknyay Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली : डॉ. डी. जी. कणसे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली : डॉ. डी. जी. कणसे


सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते त्याचबरोबर  स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य माणसाला अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्याची ताकद दिली असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. 
     
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात समान संधी मिळण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. यामुळे सामान्य माणसाला अन्यायाविरुद्ध दाद मागता आली. शिकल्याशिवाय माणसाला न्याय, अन्याय आणि हक्क याची जाणीव होणार नाही असा मूलमंत्र त्यांनी दिला. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.  या महामानवाची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी होत असते.  विद्यार्थ्यांनी या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काहीतरी विधायक कार्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेल्यास त्यांच्या जयंतीचे फलित ठरेल.'
        
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक  उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)