Header Ads

Loknyay Marathi

व्यक्तिमत्त्व विकासासाठी संवाद कौशल्य आवश्यक: प्रा. प्रमोद पाटील

व्यक्तिमत्त्व विकासासाठी संवाद कौशल्य आवश्यक: प्रा. प्रमोद पाटील


सांगली: आजच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तिमत्त्व विकास ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा विकास करणे व त्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करणे, त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय. त्यासाठी संवाद कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा.प्रमोद पाटील यांनी केले. येथील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत ' Soft skills' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजन करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते.
        
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. अश्विनी तातुगडे म्हणाल्या की, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी कौशल्ये संपादन करून व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवला पाहिजे. तसेच भाषिक कौशल्ये आत्मसात करूनही आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी सुदृढ शरीराबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचे असते असे मत व्यक्त केले.
     
      
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, 'कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्या अंगी काही गुण आवश्यक असावे लागतात. त्यासाठी संवाद कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.'
          
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, नॅक समन्वयक व उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, ज्येष्ठ प्रा. टी. आर. सावंत, अग्रणी महाविद्यालय समितीचे समन्वयक प्रा. सतिश कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले. आभार डॉ. पूनम शेळके यांनी मानले. तर कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा. नरेश पवार यांनी केले. या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)