Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या स्मृतीस अभिवादन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या स्मृतीस अभिवादन


सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अभिजितदादा कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, जागतिक स्तरावर भारती विद्यापीठाचे नावलौकिक व्हावे असे अभिजित दादांचे स्वप्न होते. त्यांनी अल्पावधीतच संस्थेच्या विकासासाठी अनेक प्रकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले होते. भारती विद्यापीठाच्या कला, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठीअभिजितदादा कदम यांचे मोलाचे योगदान होते. शिक्षणाबरोबरच सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे असा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. आज भारती विद्यापीठ सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे हे त्यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होताना दिसत आहे.
     

या कार्यक्रमाच्यावेळी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)