डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा बहुजन समाजाला त्यांचे न्याय, हक्क मिळवून देणारा लोकराजा होता. त्यांनी सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण योजना अमलात आणली. त्याचबरोबर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू केली. समाजसुधारणेच्या दृष्टीने त्यांनी अनेक लोक हिताचे कायदे करून शेवटपर्यंत अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. समाजातील सर्व जाती, धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य पुढे चालवण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले आहे. महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले त्यापैकी छत्रपती शाहू महाराज हे एक महत्त्वाचे समाजसुधारक होते. त्यांचा जन्म दिवस हा संपूर्ण राज्यात 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
यावेळी महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth 's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment