Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा

सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून M.Sc. Pre-entrance परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून चारशेहून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा निश्चित उपयोग होईल.
     
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचे संयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे समन्वयक डॉ. ए. आर. सुपले व डॉ. टी. आर. लोहार यांनी केले होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)