Header Ads

Loknyay Marathi

संविधान हा भारताच्या प्रजासत्ताकाचा मूलाधार - डॉ. डी. जी. कणसे

संविधान हा भारताच्या प्रजासत्ताकाचा मूलाधार-डॉ.डी.जी. कणसे
सांगली- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हा आपल्या देशाचा महान दस्तऐवज असून तो भारत देशाच्या सार्वभौम प्रजासत्ताकाचा मूलाधार आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'संविधान दिन' प्रसंगी ते बोलत होते. आपल्या संदेशात पुढे ते म्हणाले की, भारत हा जगातील मोठी लोकशाही असलेला देश असून संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे. म्हणून या संविधानातील मूल्यांचा प्रत्येक व्यक्तीने आदर केला पाहिजे.
यावेळी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना सातपुते यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ.विकास आवळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. रूपाली कांबळे इ. उपस्थित होते. या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचे परीक्षक म्हणून मराठी विभागाचे प्रा.डॉ. कृष्णा भवारी यांनी काम पाहिले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. (Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)