Header Ads

Loknyay Marathi

माहिती तंत्रज्ञानाचा वापर: काळाची गरज- डॉ. एस. ए. एन. इनामदार

भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे ग्रंथालय विभागामार्फत गुरुवार दि. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी ‘राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह’ निमित्त ‘Use of ICT in Teaching and Learning Process’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सदर चर्चासत्रास ज्येष्ठ ग्रंथपाल डॉ. एस. ए. एन. इनामदार व प्रा. ए. ए. मासुले प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.
राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह निमित्त ग्रंथालय शास्त्राचे जनक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सत्रात महाविद्यालयामध्ये टिचिंग- लर्निंग साठी माहिती तंत्रज्ञानाचा चा वापर करणे ही आज काळाची गरज ठरली आहे असे प्रतिपादन डॉ. एस. ए. एन इनामदार यांनी केले. पुढे बोलताना डॉ. इनामदार यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्राध्यापकांनी कसा वापर करावयाचा, व यासाठी कोणकोणती अॅप्लीकेशन्स वापरावयाची यांचे प्रात्यक्षिकांसह उदाहरण दिले. त्याचबरोबर ग्रंथालय वापरकर्त्यांनी माहिती शोधण्यासाठी कोणकोणते ICT टूल्स आहेत व ते कसे वापरावयाचे यावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर टिचिंग – लर्निंग प्रोसेस मध्ये ग्रंथालयांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या सत्रात प्रा. ए. ए. मासुले यांनी E-Content Development या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये प्राध्यापकांनी व ग्रंथालयांनी महाविद्यालयातील प्रत्येक विषयाची डिजीटल रिपॉझिटरीझ कशी तयार करावयाची याचे मार्गदर्शन केले.
भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी आज माहिती तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करावा. इंटरनेटवर अनेक प्रकारची माहिती, व्हिडीओ यांचा खजिना उपलब्ध आहे, याचा शिक्षकासाठी चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल याकडे विद्यार्थ्यांनी पहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. डी जी. कणसे म्हणाले की, बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर शिक्षक आणि विद्यार्थी या दोघानीही केला पाहिजे असे मत व्यक्त केले व त्यासाठी आपल्या महाविद्यालयाने इ-डेटाबेसची मेंबरशीप घेतलेली आहे, व यातील इ-बुक्स, इ- जर्नल्स यांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. प्रा. जयश्री हाटकर यांनी केले, तर आभार ग्रंथालय कमिटीचे संयोजक व मराठी विभागप्रमुख डॉ. के.एम. भवारी यांनी मानले. सूत्रसंचालन ग्रंथालय कमिटी सदस्य डॉ. विकास आवळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. एस. एन. बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांच्यासह अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी अशा एकूण ७६ जणांनी सहभाग घेतला.