Header Ads

Loknyay Marathi

महाविद्यालयाच्या टेरेसवर फुलताहेत औषधी वनस्पती

महाविद्यालयाच्या टेरेसवर फुलताहेत औषधी वनस्पती

सांगली : येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये वनसतीशास्त्र विभाग आणि इनरव्हील क्लब ऑफ सांगली मिडटाऊन सनराईज सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या टेरेसवर विविध औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. 

यावेळी उपस्थित इनरव्हिल क्लब ऑफ सांगलीच्या अध्यक्षा सौ. किर्ती सोनवणे यांनी 'शहरी भागात टेरेस गार्डन संकल्पनेतून औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन करणे ही एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे, असे मत व्यक्त करीत महाविद्यालयातील या उपक्रमाचे कौतुक केले.


'सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषधी वनस्पती व त्यांचा वापर याला अनन्य साधारण महत्व आले आहे', असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य व या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले. 

सदर उपक्रमामध्ये इनरव्हिल क्लब ऑफ मिडटाऊन सनराईज सांगलीच्या सचिव सौ. ममता काबरा, खजिनदार सौ. दिपाली देशमुख, माजी जिल्हाध्यक्षा (डिस्ट्रीक्ट 317) सौ. नंदा झाडबुके, आय. एस. ओ. डॉ. मृण्मयी बिरनाळे, माजी अध्यक्षा व महाविद्यालयातील  विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सौ. प्रभा पाटील , कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.आर. सावंत, अंतर्गत गुणवत्ता हमी विभागप्रमुख डॉ. ए.आर. सुपले, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. बी. आवळे, प्रा. एच. व्ही. वांगीकर, प्रा. एम. पी. गावित, प्रा. ए. बी. खडतरे, प्रा. एन. डी. पवार इत्यादी उपस्थित होते.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)