Header Ads

Loknyay Marathi

प्राचार्य डॉ. डी .जी. कणसे राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित

 प्राचार्य डॉ. डी .जी. कणसे राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित 


तासगाव | दि. २५/०९/२०२१ 


भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांना नुकताच "प्रतिष्ठा शिक्षणरत्न पुरस्कार - २०२१" राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार प्राप्त झाला. 

साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक विश्‍वात मानाचा शिरपेच धारण करणाऱ्या प्रतिष्ठा फौंडेशनच्या राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्काराने भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांना साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड, व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यांत आले.

 


प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सांगली जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष, साताराच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या गव्हर्निग बॉडी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी, फर्ग्युसन कॉलेज पुणे रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत असून उपक्रमशील  प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.