चांगुलपणाच्या चळवळीत तरुणाईने सहभागी व्हावे - मा. यशवंत शितोळे
चांगुलपणाच्या चळवळीत तरुणाईने सहभागी व्हावे - मा. यशवंत शितोळे
सांगली;२३ माहिती व तंत्रज्ञानाच्या अश्र्वावर आरूढ झालेल्या तरुणाईने चांगल्या गुणवत्तेचे व कौशल्यावर आधारित असणारे शिक्षण घ्यावे. त्याबरोबरच सामजिक कार्यात हिरीरीने सहभागी व्हावे. असे मत चांगुलपणाच्या चळवळीचे समन्वयक मा.यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या 'चांगुलपणाच्या चळवळीचे समन्वयक मा. यशवंत शितोळे यांनी भेट दिली. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी शितोळे यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.
मार्गदर्शनपर भाषणात यशवंत शितोळे म्हणाले की, इथून पुढच्या काळात उद्योग, व्यवसाय व व्यापाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. एवढेच नव्हे तर अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा नव्याने सुरळीत सुरू होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आशावादी राहून नव्या जोमाने कार्यरत राहण्याची गरज आहे.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासासाठी चांगुलपणाच्या चळवळी मार्फत रबिवित असलेल्या विविध कौशल्यावर आधारित असणाऱ्या उपक्रमात सहभागी होऊन विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करावीत.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे यांनी केले.
Post a Comment