Header Ads

Loknyay Marathi

मध्यवर्ती युवा महोत्सवात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सानिका संजीव मिटके मातीकाम स्पर्धेत द्वितीय क्रमांक

मध्यवर्ती युवा महोत्सवात डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सानिका संजीव मिटके मातीकाम स्पर्धेत द्वितीय क्रमांक 

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कराड येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने सन २०२०-२१ या वर्षाचा  मध्यवर्ती युवा महोत्सव संपन्न झाला. त्यामध्ये भारती विद्यापीठाच्या सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. सानिका संजीव मिटके हिने मातीकाम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. 

विद्यार्थीनीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर करून जे यश संपादन केले ही बाब नक्कीच आशादायी व अभिनंदनीय आहे.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सानिका मिटके म्हणाली की, मला शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली एवढेच नव्हे तर  मला यश संपादन करता आले. त्याबद्दल शिवाजी विद्यापीठ व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाची मी ऋणी आहे.

याबद्द्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी अभिनंदन केले.

कु. सनिका मिटके हिला ग्रंथपाल प्रा. जे. डी. हाटकर, प्रा. डॉ. नितीन गायकवाड, प्रा. डॉ. वर्षा कुंभार, प्रा. एन. एन. नाटके, प्रा. एस. एन. कांबळे यांचे मार्गदर्शन मिळाले.