Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे स्वातंत्र्य दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे स्वातंत्र्य दिन साजरा
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ७४ वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. 

महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत शासकीय नियमानुसार ध्वजारोहण करण्यात आले.