Header Ads

Loknyay Marathi

कोरोना व्हायरस : दहावीचा २३ मार्च रोजी होणारा शेवटचा पेपर पुढे ढकलला

कोरोना व्हायरस : दहावीचा २३ मार्च रोजी होणारा शेवटचा पेपर पुढे ढकलला

नवी तारीख ३१ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे


दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. नवी तारीख ३१ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दहावीचा एकच पेपर उरला होता. जो २३ मार्च रोजी होणार होता. मात्र करोना व्हायरसची (Corona virus) रुग्ण संख्या वाढल्याने आणि खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. इतके दिवस दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये बदल होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता वर्षा गायकवाड यांनी दहावीचा पेपर पुढे ढकलला आहे.

काय म्हणाल्या प्रा. वर्षा गायकवाड?

राज्यातील प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भातल्या निर्णयाची घोषणा ही ३१ मार्चनंतर केली जाईल.