रविवार २२ मार्च: जाणून घ्या एक दिवसीय जनता कर्फ्यू...!
रविवार २२ मार्च: एक दिवसीय जनता कर्फ्यू
एक दिवसीय कर्फ्यूचा उद्देश जाणूया. कोरोना विषाणूचे आयुष्य काही पृष्ठभागांवर १२ तासांपेक्षा कमी आहे आणि जनता कर्फ्यू १४ तासाचा, म्हणजे या १४ तासांमध्ये ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी कॅरोना चे विषाणू आहेत अशा ठिकाणी किंवा पॉईंट्सना नक्कीच स्पर्श केला जाणार नाही व आपोआप ही *साखळी तुटण्यास* मदत होईल.
बरेचजण ऑफिसवरून शनिवारी रात्री घरी पोहोचल्यावर बाहेर पडणार नाहीत असे गृहीत धरूया. रविवार सकाळपासून जनता कर्फ्यू रात्री 9 वाजेपर्यंत लागू होईल. रविवारी रात्री 9 नंतर कर्फ्यू संपला तरी बहुसंख्य जनता घरातून बाहेर पडणार नाही असे गृहीत धरायला हरकत नाही.
म्हणजे तसं पाहिलं तर शनिवार रात्रीचे 9 पासून जास्तीत जास्त लोक 24 तास + रविवार रात्री 9 पासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत 10 तास = 34 तास घरात असतील. (इथे गृहीत धरले आहे की सोमवारी सकाळी 7 वाजता व्यक्ती कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली आहे.)
14 तासाच्या (किंवा वरीलप्रमाणे पाहिलं तर 34 तासांच्या) जनता कर्फ्यूमुळे आपण स्वतःला व आपल्या परिवाराला या महाविषाणूपासून सुरक्षित करण्याचा चांगला प्रयत्न करीत आहोत.
प्रत्येक विषाणूला जिवंत राहण्यासाठी HOST लागतो. इथे HOST म्हणजे मानवी शरीर असे म्हणूया. तर जनता कर्फ्यूमुळे HOST न मिळाल्याने विषाणूंच्या फैलावास अटकाव होईल. यालाच म्हणतात... "BREAKING THE CHAIN."
म्हणून प्रत्येकाने जनता कर्फ्यू मध्ये सामील होऊन स्वतःला, आपल्या परिवाराला व आपल्या शेजार्यांना आणि आपल्या देशवासीयांना सुरक्षित करायचे आहे.
जर आत्ता हे झाले नाही तर मग भविष्यातील LOCK DOWN सारख्या इतर कडक उपायांना सामोरे जाण्यापासून दुसरा पर्याय शिल्लक नाही. (सध्या इटली व स्पेन या दोन देशात LOCK DOWN सारखी स्थिती आहे.)
चला तर मग, आपण प्रामाणिक प्रयत्न करुया. तोडूया ही साखळी.
Let's BREAK THE CHAIN.
Yes, You Can...We Can... Do It Togetherly...!
🇮🇳🙏🏼🇮🇳🙏🏼🇮🇳🙏🏼🇮🇳🙏🏼🇮🇳🙏🏼🇮🇳🙏🏼🇮🇳🙏🏼
Post a Comment