डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या विषयी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की, लोकमान्य टिळक यांचा स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळक हे महान क्रांतिकारी समाजसुधारक, शिक्षक, वकील तर होतेच पण ते एक मोठे लेखक देखील होते. ते जहाल मतवादी विचारसरणीचे होते. आक्रमकता आणि निर्भीड वृत्तीमुळे त्यांनी इंग्रज सरकारला धारेवर धरले होते. 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून त्यांची संपूर्ण भारतात आजही ख्याती आहे. या दोन्ही महापुरुषांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख श्री. ए. एल. जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने केले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment