Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात यशवंतराव मोहिते यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात यशवंतराव मोहिते यांची जयंती साजरी


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयत भारती विद्यापीठाचे प्रथम अध्यक्ष कै. यशवंतराव मोहिते यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तानाजी सावंत आदी उपस्थित होते.
             
या वेळी यशवंतराव मोहिते यांच्या आठवणींना प्राचार्य डॉ. कणसे यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, 'यशवंतराव मोहिते हे निष्ठावान, कुशाग्र व तत्त्वनिष्ठ राजकारणी होते. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान आहे. भारती विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच डॉ. मोहिते हे भारती विद्यापीठाचे तहहयात अध्यक्ष राहिले. डॉ. पतंगराव कदम यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामाची धडाडी पाहून डॉ. मोहिते यांनी त्यांच्यावर एस. टी. महामंडळाच्या सदस्यपदाची जबाबदारी टाकली आणि त्यातूनच डॉ. पतंगराव कदम यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्या अर्थाने डॉ. यशवंतराव मोहिते हे डॉ. पतंगराव कदम यांचे राजकीय गुरु होते असे म्हणता येईल. अध्यक्षस्थानी असूनही त्यांनी भारती विद्यापीठाच्या कारभारात कधीही हस्तक्षेप केला नाही. भारती विद्यापीठाचा विस्तार आणि विकास पाहून त्यांना अतिशय आनंद होत असे.'
 
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले होते. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)