Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात आधारकार्ड विषयक सुविधा शिबिराचे आयोजन

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात आधारकार्ड विषयक सुविधा शिबिराचे आयोजन


सांगली: महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक ०२ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत 'महसूल सप्ताह' साजरा केला जात असून त्यानिमित्ताने महाविद्यालयात आधारकार्ड विषयक सुविधा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नवीन आधारकार्ड काढणे, कार्डात दुरुस्ती करणे व आधारकार्ड संबंधी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.या शिबिरासाठी शासनाने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे नेमणूक केलेली असून नागरिकांच्या आधारकार्ड विषयक समस्यांचे निराकरण त्यांच्याकडून केले जाईल असे महसूल विभागाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
    
तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शिबिराची माहिती देऊन आधारकार्ड विषयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)