डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते, त्यांनी बहुजनांच्या हितासाठी शैक्षणिक क्रांती घडवून आणली. श्रमप्रतिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांचा त्यांनी शेवटपर्यंत अंगिकार केला होता. स्वावलंबन, स्वाभिमानी, स्वाध्याय व स्वातंत्र्य या चतु:सूत्रिचा अवलंबन करून खेडोपाडी ज्ञानाचा दिवा घरोघरी पेटविला. म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर लाखो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनले पाहिजे.
यावेळी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत व कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. ए. एल. जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment